भाजपा लहान मुलांसारखी चिडतेय !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अवघ्या काही दिवसांवर येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपाला शरद पवारांची भीती असून भाजपा ही लहान मुलांसारखी चिडत असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

या आरोपासह मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर पवारांचे नातु रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.

लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगला खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा.

तसेच हे ‘ईडी’चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की चिडायचं अश्या शब्दांत शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment