कर्जत – जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली जामखेड मध्ये काढण्यात आली.

कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. या मिरवणुकीत तब्बल 30 जेसीबींच्या साह्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

पवार यांच्यावर गुलाल उधळण्यासाठी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आले होते. 30 जेसीबींमधून गुलाल उधळून रोहित पवार यांचे स्वागत करण्यात आले.

निवडून आल्यानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार पहिल्यांदाच जामखेड शहरात आले होते. आभार मानल्यानंतर रोहित पवार यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर पवार यांची सभा झाली.
तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेडमध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत जेसीबी मिशिन्सच्या साह्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 28 जेसीबी मिशिन्स सर्व शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या.

रोहित पवार असलेली गाडी जशी चौकात येत होती तसं कार्यकर्ते जेसीबीतला गुलाल उधळत होते. त्यामुळे सगळं शहर गुलालात माखलं गेलं होतं.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जेसीबीतून गुलाल उधळण्याची नवी पद्धत आणली आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं होतं. आता मुंडे यांच्यानंतर पवार यांच्यावरही जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळळण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
- Explained : विखे-थोरात पुन्हा समोरासमोर ? ZP निवडणुकीत लागणार खऱ्या ताकदीचा कस
- साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत खा. नीलेश लंके यांची भारतीय लष्करासाठी प्रार्थना
- नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- IDBI Bank मध्ये 676 पदांची जंम्बो भरती; पात्रताही अशी की अनेकांना भरता येणार अर्ज
- चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण