खा . दिलीप गांधी समर्थकांची भूमिका गुलदस्त्यात

Published on -

अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.

पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.

तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.

त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe