जिल्हा परिषद सदस्य सदाअण्णा पाचपुते यांच कोरोनामुळे निधन

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- माजीमंत्री तथा श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांच कोरोनामुळे निधन झाले आहे. 

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून राजकीय क्षेत्रातील लोकही कोरोनाचे शिकार होत आहेत. जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे गटनेते सदाशिव पाचपुते यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. 

श्रीगोंदा तालुक्यातील नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. 

आयुष्यात एकदाही निवडणूक लढवणार नाही असे म्हणणारे पाचपुते यांनी यावेळी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले होते.त्यानंतर जिल्हापरिषदेत भाजप गटनेते पदी त्यांची निवड झाली होती.

ते साईकृपा शुगर प्रायव्हेट लिमिटेड ढवळगाव चे अध्यक्ष होते .काष्टी येथील कृष्णाई डेअरी चे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. 

श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक निवडणूक मध्ये ते बॅक स्टेज चे सर्व काम आतापर्यंत जबरदस्त पार पाडायचे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe