साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे.

सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने नियोजनाचा आराखडा तयार ठेवला आहे. 

शिर्डी येथील साई मंदिरात साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून हजारों भाविक शिर्डी येथे येत असतात. दररोज लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत येतात.

त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असतो. अशावेळी जर एखादा कोरोनाबाधित रुग्ण या ठिकाणी आल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

दरम्यान, दर्शनरांगेत प्रत्येक भाविकांची इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासणी करणं देखील अवघड होत असल्याने शिर्डी मंदिर विश्वस्त समितीनेशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता .

कोरोना व्हायरसमुळे इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी येथील साई बाबाच मंदिर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बंद ठेवण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment