संगमनेर :- तालुक्यातील बिरेवाडी परिसरात राहणा-या एका कुटुंबातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला भरदिवसा दुपारी १ ते २ च्या सुमारास काहीतरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
प्रविण आनंदा डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुरनं. १४३ दाखल करण्यात आला आहे,
दरम्यान घारगाव पोलीस सदर मुलगी व आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे