संगमनेर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा – नगराध्यक्षा तांबे

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- नगरपरिषदेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या १२८ कोटी ५१ लक्ष ५३ हजार रुपये रकमेचा अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सांगितले.

नगरपरिषदेचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प सभागृहाची मान्यता मिळण्यासाठी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला.

यावेळी विश्वास मुर्तडक, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नगरसेवक नितीन अभंग, सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुमित्रा दिड्डी, कुंदन लहामगे, सुनंदा दिघे, बाळासाहेब पवार, शेख शमा, नुरमोहम्मद शेख, गजेंद्र अभंग, शबाना बेपारी, मनीषा बळगट, मेघा भगत, योगिता पवार, शैलेश कलंत्री,

डॉ. दानिश खान, नसीम बानो पठाण, हिरालाल पगडाल, प्रियंका भरितकर, राजेंद्र वाकचौरे, मालती डाके, किशोर टोकसे, किशोर पवार यांसह प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, राजेंद्र गुंजाळ, लेखापाल अशोक गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीची शिल्लक अंदाजे ६ लाख ६८ हजार, महसुली जमा एकूण ३९ कोटी २७ लाख ४३ हजार भांडवली जमा, एकूण ८९ कोटी १४ लाख १० हजार असे एकूण १२८ कोटी ५१ लाख ५३ हजार रुपये जमा व महसुली खर्च ३३ कोटी ८७ लाख ६५ हजार व भांडवली खर्च ९४ कोटी ५७ लाख २० हजार असे एकूण १२८ कोटी ४४ लाख ८५ हजार रुपये खर्चाच्या ६ लक्ष ६८ हजार अखेरच्या शिलकी रकमेच्या अर्थसंकल्पास सभागृहाने एकमताने मान्यता दिली.

घरगुती पाणीपट्टीमध्ये दोनशे रुपये व व्यवसायिक पाणीपट्टीमध्ये एक हजार रुपयांची करवाढ करण्यात आली असून शहरात भुयारी गटार योजनेसाठी राज्यस्तर नगरोत्थान अभियानांतर्गत २२ कोटी रुपये, नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे कामी ५० लाख, वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेसाठी १० कोटी रुपये, विशेष रस्ता अनुदान १० कोटी रुपये व १४ व १५ वा वित्त आयोग १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment