‘त्या’ पाणी योजनेशी विखेंचा संबंध नाही

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला.

त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते.

त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले.

अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला आहे. पूर्वीच्या तुलनेत विखे पिता-पुत्रांचा संगमनेरमधील वावर अधिक वाढला असूूून त्याला आक्रमकतेचीही जोड मिळाली आहे. अंभोरे पेेेेयजल योजनेचे भूमिपूजन थोरात आणि विखे यांनी एकापाठोपाठ वेगवेगळ्या वेळी केले.

सरपंच खेमनर म्हणाले, ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार थोरात यांनी पेयजल योजनेसाठी पाठपुरावा केला. याकामी इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही पुढाकार घेतला. योजनेशी संबंध नसताना विखे उद्घाटनासाठी आले.

त्या कार्यक्रमात अंभोऱ्याचे कमी व बाहेरगावचेच नागरिक जास्त होते. योजना मंजूर झाली तेव्हा विखे सत्तेत नव्हते. आता ते युती सरकारचे गोडवे गात असले, तरी दोन महिन्यांपूर्वी भाजपचे वाभाडे काढत होते. योजनेचे काम थोरात यांनी मार्गी लावले, असे खेमनर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment