संगमनेर : ‘ती’ आकडेवारी लक्षात घेता शहरासह तालुक्­यातील स्थिती गंभीरतेकडे जाणारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर येथे दोन परदेशी व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने ते जिल्ह्यातील कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती जिल्हा प्रशासनाने काढली. त्याआधारे संगमनेरच्या प्रशासनाला माहिती दिली.

त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया यांनी पथकासह संबंधित भागांमध्ये धाव घेतली.

चौकशीत पंधरा व्यक्ती थेट संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले. शहरातील या सर्व व्यक्ती नाईकवाडपुरा, रहेमतनगर, बागवानपुरा या परिसरात राहणारे आहेत. त्यातील एक तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राहतो.

पंधरापैकी एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यासह सर्व पंधरा जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा तपासणीचा अहवाल लवकरच येणार आहे.

त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना आणि परिसरात राहणाऱ्या सर्वांनाच प्रशासनाने होम क्वारंटाईनचे आदेश दिले आहेत. पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. मंगरुळे व डॉ. कचेरिया यांनी सांगितले की, शहरातून येणारा पुणे-नाशिक महामार्ग तीन बत्ती चौकापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

या मार्गावर आता कुणीही जाऊ नये. शहरवासीयांनी आता अधिक सतर्क होण्याची गरज आहे. तालुक्यातील एकूण ७ हजार ७९५ लोकांना होम क्वारंटाईन शिक्के मारण्यात आलेले आहेत. त्यांचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

यामध्ये एकूण ७० लोक परदेशातून आलेले असून, २५१ लोक परराज्यातून आले आहेत. इतर लोक मुंबई, पुणे अशा बाधित शहरातून आलेले आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता शहरासह तालुक्­यातील स्थिती गंभीरतेकडे जाणारी आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment