अहमदनगर :- रोहित पवार यांनी शनिवारी शहरातील पक्षाचे आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कानाडोळा केल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची भेट घेत बंद खोलीत गुफ्तगू केले. आ. जगताप पितापुत्रांना त्यांनी का टाळले, यावरून कुजबुज सुरू झाली आहे.
गेले दोन दिवस रोहित पवार नगरमध्ये होते मात्र नगर शहराचे आमदार आ. जगताप यांच्याशी भेट झालेली नाही.
विशेष म्हणजे दोन्ही दिवस आ. संग्राम जगताप नगरमध्येच होते. दोन दिवस पवार नगरमध्ये होते मात्र भेट झाली नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर आ. जगताप पितापुत्र राष्ट्रवादीपासून दूर जाऊ लागल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी मुंबईत पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आढावा बैठक झाली.
या बैठकीला आ. जगताप पितापुत्रांनी पाठ दाखविली. लोकसभा निवडणुकीनंतर शहरातील विविध कार्यक्रमात आ. जगताप पक्षातील अन्य नेत्यांपेक्षा आपल्या समर्थकांसह दिसू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कळमकर यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून आ. जगताप यांचा प्रचार केला. मात्र या निवडणुकीनंतर दोघे एका व्यासपीठावर आलेले दिसले नाहीत.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी कळमकर यांची घेतलेली भेट आणि त्यांच्याशी केलेले गुफ्तगू राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले आहेत.
माजी आमदार दादाभाऊ कळमकर व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी रोहित यांनी बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा केली.
- महिन्याचा पगार 1 लाख रुपये असेल तर कोणती SUV कार ठरणार बेस्ट ? 4 पर्याय जाणून घ्या
- दिवसा वडापावच्या गाडीवर काम, रात्री शाळा करत ४७ व्या वर्षी अहिल्यानगरच्या मंगला बोरुडे झाल्या दहावी पास
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! २३४ हेक्टर पिकांचे नुकसान तर ४८१ शेतकऱ्यांना बसला फटका
- संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण! कोणाची गुलामगिरी स्विकारू नका एकजुटीने लढा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
- निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण थांबवा, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार- डाॅ. सुजय विखे