Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजनांसाठी सेतूमार्फत तहसीलदारांकडे अर्जदार अर्ज दाखल करतात.
उपयुक्त कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अर्ज हे या योजनेचे अशासकीय सदस्यांच्या कमिटीमध्ये तहसीलदार हे सचिव म्हणून प्रकरणांना मंजुरी देतात. परंतु सद्यस्थितीला अशासकीय समिती बरखास्त करण्यात आलेली आहे.
नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून अशासकीय सदस्यांच्या समित्या गठित नाही. त्यामुळे शासकीय निर्देशांकानुसार तहसीलदार. गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या शासकीय समितीला संबंधित प्रकरणांना मान्यता देण्याचे सूचित केले आहे.
पाचशे रुपयांनी वाढ
निराधारांना सुरुवातीला प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये अनुदान दिले जात होते. ते २०१९ मध्ये एक हजार रुपये दिले जात होते. शासनाच्या २०२३ मध्ये आलेल्या नवीन जीआरप्रमाणे पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
ऑनलाइन पद्धतीने लाभार्थीना वाटप
राहुरी तालुक्यामध्ये निराधार लाभार्थीची एकूण संख्या सात हजार ६४६ असून, ५८ लाख ६७ हजार ३०० रुपये इतका निधी महिन्याला प्राप्त होतो. निधी प्राप्त होताच ऑनलाइन पद्धतीने लाभार्थीना वाटप केले जात असल्याची माहिती राहुरीचे नायब तहसीलदार सचिन औटी यांनी बोलताना दिली आहे.
संजय गांधी निराधार योजना
■ या योजनेमध्ये तालुक्यामध्ये एकूण लाभार्थी दोन हजार ९२३ इतके लाभार्थी आहेत. प्रत्येक लाभार्थीला राज्य शासनाचे ७०० रुपये, तर केंद्र शासनाकडून मिळणारे ३०० असे एकूण एक हजार रुपयांचे अनुदान वितरित केले जात होते. आता त्यामध्ये वाढ होणार असल्याचे जाहीर झाले आहे. सद्यस्थितीला या योजनेत एकूण २८ लाख ९१ हजार ९०० रुपये निधी ऑनलाइन पद्धतीने वाटप केला जातो.
इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तिवेतन योजना
या योजनेमध्ये राहुरी तालुक्यात एक हजार ७८७ लाभार्थी आहेत. प्रत्येकी लाभार्थीला केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त अनुदानाप्रमाणे तीन लाख ६७ हजार ६०० रुपये निधी ऑनलाइन पद्धतीने वाटप केला जातो.
■राहुरी तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्ध काळ निवृत्तिवेतन योजनेसाठी एकूण सात हजार ६४६ लाभार्थी आहेत. या लाभार्थीना दर महिन्यासाठी ५८ लाख ६७ हजार ३०० रुपये निधी राहुरी तहसील कार्यालयाला प्राप्त होतो. हा निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थीच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो.