Sarkari Yojana: महाराष्ट्र सरकारने आणली नवी योजना! घरातील वृद्ध नागरिकांच्या खात्यात जमा होतील 3 हजार, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
cm vayoshri yojana

Sarkari Yojana:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहे. काही योजना या शेतकऱ्यांसाठी आहेत तर बऱ्याच योजना या व्यवसायिकांसाठी असून अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या  घटकांकरिता आर्थिक मदत करण्यात येते व जेणेकरून आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक स्तर उंचवावा हा त्यामागचा उद्देश आहे.

याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली असून या योजनेचा लाभ हा 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

 काय आहे नेमकी मुख्यमंत्री वयोश्री योजना?

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता देण्यात आली आहे व या योजनेच्या माध्यमातून आता 65 वर्षांवरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

जर आपण या योजनेचे स्वरूप पाहिले तर यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व तसेच अशक्तपणा यांचे निराकरण करण्याकरिता  आवश्यक असलेल्या उपकरणाची खरेदी करण्यापासून ते मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवता यावी याकरिता मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांच्याद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त करणार आहेत. तसेच यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल व जे यामध्ये पात्र होतील त्यांना तीन हजार रुपयांचा एक रक्कम थेट लाभ अशा नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेकरिता 480 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली असून राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सध्या संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान असून यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थ यामुळे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच राज्याच्या या योजनेसोबत केंद्राची देखील राष्ट्रीय योजना असून ती राज्यातील काही निवडक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते. परंतु आता हे मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

 बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

 तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या या झालेल्या बैठकीमध्ये अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा व त्यांच्या देखभालिकरता अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. या अगोदरच्या शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती व आता यामध्ये सुधारणा होऊन बांबूच्या देखभालीसाठी देखील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

साधारणपणे दोन हेक्टर क्षेत्राकरिता बाराशे रोपे लागवड व देखभालिकरीता प्रतिरोप 175 रुपये अनुदान तीन वर्षात देण्यात येणार आहे. तसेच बांबू रोपांची निंदनी, पाणी देणे तसेच संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्यांना याचा आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होईल हा सरकारचा या मागचा उद्देश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe