सरपंचपदाचा लिलाव ही लोकशाहीची थट्टा : नगराध्यक्ष विजय वहाडणे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावाला २५-३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात आहे.

जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा पवित्र मतदान आहे. पण मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. ठरावीक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा रात्रंदिवस गजर करणाऱ्या नेत्यांना घटनेचा विसर पडलेला दिसतो. अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी असे करायला हरकत नाही. परंतु सरपंचपदाचा लिलाव म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही अशा गैरप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment