Sarpanch Salary:- ग्रामीण भागाच्या विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे आपल्याला माहिती असते. ग्रामपंचायतचे प्रमुख पद जर म्हटले तर राजकीय दृष्टिकोनातून सरपंच या पदाला देखील खूप महत्त्व आहे.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. तसेच आता सरपंचाची निवड ही थेट जनतेमधून होत असल्यामुळे देखील आता या पदाला खूप महत्त्व मिळाले आहे. तीन जुलै 2017 रोजी मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतला त्या अन्वये आता सरपंचाची निवड थेट जनतेच्या माध्यमातून केली जाते.
त्यामुळे आता बरेच व्यक्ती सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावतात व त्यासाठी वाटेल तो खर्च करण्याची तयारी देखील असते. या अनुषंगाने आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल की सरपंच पदासाठी जी काही चढाओढ केली जाते त्यामुळे सरपंच असलेल्या व्यक्तीला नेमके किती पगार किंवा मानधन शासनाकडून मिळत असेल? याबद्दलची माहिती या लेखात आपण घेण्याचा प्रयत्न करू.
अगोदर सरपंचांना किती मिळायचा पगार?
सरपंचांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंच यांना मानधन सुरू करण्यासाठीचा महत्वपूर्ण शासन निर्णय 30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला. परंतु त्याआधी सरपंचांना किती मानधन मिळायचे व ते गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विभागलेले असते.
1- शून्य ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत– अगोदर या लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम 1000 रुपये होती. यामध्ये शासनाकडून 75 टक्के तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वतःच्या निधीमधून देत असे.
2- 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन– या लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दरमहा पंधराशे रुपये एवढे मानधन मिळत होते.
3- 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा सरपंचाला मिळणारे मानधन– या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधन प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये एवढे होते.
३० जुलै 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार सरपंचांच्या मानधनात झाली वाढ
30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्राच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंचांना मानधन सुरू करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना सरपंचांच्या मानधनामध्ये वाढ केली व उपसरपंच यांना देखील मानधन सुरू केले. तर या नवीन शासन निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांना पुढील प्रमाणे मानधन मिळते.
1- शून्य ते 2000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाचे मानधन– या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाचे दरमहा मिळणारी रक्कम आता तीन हजार रुपये आहे तर उपसरपंचाला मिळणारी मानधनाची रक्कम दरमहा 1000 रुपये आहे. त्यामध्ये देखील शासनाकडून 75% तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीतून देते.
2- 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती– या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दरमहा चार हजार रुपये इतके मानधन मिळते तर उपसरपंचाला पंधराशे रुपये मानधन मिळते.
3-8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती– या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन मिळते तर उपसरपंचाला दोन हजार रुपये इतके मानधन मिळते.