Satbara Utara Update:- शेतीसंबंधी कुठल्याही प्रकारची शासकीय कामे असतील तर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा संबंध हा प्रामुख्याने तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत यांच्याशी प्रामुख्याने येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालय हे शेतीच्या कागदपत्रांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे कार्यालय असून यासंबंधी महत्त्वाचे जबाबदारी पार पाडण्याचे काम तलाठीमार्फत पार पाडले जाते.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने शेतीच्या संबंधित काही कागदपत्र हवे असतील तर त्यामध्ये सातबारा आणि आठ अ चा उतारा खूप महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असतात. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना या कागदपत्रांची आवश्यकता भासते तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो.
परंतु तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील बऱ्याचदा वेळेला तलाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतील असे होत नाही व त्यामुळे नक्कीच कागदपत्रांअभावी कामे रखडले जातात. या सगळ्या त्रासापासून शेतकऱ्यांचे मुक्तता व्हावी याकरिता आता या डिजिटल युगामध्ये भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक कामे हे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील सातबारा आणि आठ अ चा उतारा काढायचा असेल तर आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नसून तुम्ही ई सेवा केंद्रात जाऊन मिनिटांमध्ये सातबारा काढू शकतात.
ई सेवा केंद्रात जा आणि 25 रुपयात सातबारा काढा
शेतकऱ्यांना आता सातबारा आणि आठ अ उतारा काढण्याकरता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नसून ई सेवा केंद्रातून अवघ्या 25 रुपयांमध्ये सातबारा आणि आठ अ चा उतारा काढू शकणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी तलाठ्याला शोधण्याची गरज भासणार नाही.
शासनाने या संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांना तलाठी ऐवजी ई सेवा केंद्र किंवा एखाद्या सायबर कॅफे मधून देखील उतारा मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनी संदर्भात जर काही इतर महत्त्वाची कामे असतील ते देखील आता ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत.
बऱ्याचदा जमिनी संदर्भात सरकारी पोर्टलवर जुने बँकेचे बोजे ऑफलाईन पद्धतीने केलेले असतात व त्यामुळे ते सातबारा उतारा वरून त्यांचा बोजा कमी केला जात नाही.
परंतु नवीन ऑनलाईन बोजा असेल तर अशा संदर्भात व्यवहारात त्यात बदल केला जाणे शक्य आहे. ही सुविधा देखील आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किंवा इतर महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्र हवी असतील ती देखील तुम्हाला महा-ई-सेवा केंद्रातून मिळू शकणार आहेत.
ई सेवा केंद्रातून 25 रुपये सातबारासाठी कसे आकारले जातात?
तसे पाहायला गेले तर तुम्हाला ई सेवा केंद्रावर सातबारा उतारा काढायचा असेल तर त्याचे शासकीय फी पंधरा रुपये आहे. परंतु त्याची प्रिंट काढण्याकरिता केंद्र चालकांकडून दहा रुपये शुल्क आकारले जाते. असे मिळून 25 रुपयात शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा सातबारा उतारा मिळतो.
ही सेवा केंद्रातून सातबारा आणि आठ अ चा उतारा काढण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
तुम्हाला देखील ई सेवा केंद्रातून सातबारा किंवा ८ चा उतारा काढायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. याकरता तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर आवश्यक असतो आणि आठ अ चा उतारा काढायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला खाते क्रमांक आवश्यक असतो.
अशा पद्धतीने तुम्ही आता तलाठ्याशिवाय सातबारा आणि आठ अ चा उतारा आरामात काढू शकणार आहात.