सत्यजीत तांबे म्हणाले पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  देशात नोटबंदी व चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता कोरोना व्हायरस आल्यानंतर लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, देशभर अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे.

अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत.

अर्थव्यवस्था हाताळण्यात केलेल्या या चुकांसाठी पुढच्या 100 पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत, या शब्दात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी हल्लाबोल केला आहे.

तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने हाती घेतलेल्या ‘कहां गये वो २० लाख करोड?’ या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधण्यात आला.

केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून त्यांना काय मदत मिळाली हे विचारण्यात आलं. जिल्हा व तालुका पातळीवर बेरोजगार युवकांशी साधलेल्या संवादातून रोजगाराची गंभीर स्थिती समोर आली आहे.

गेलेल्या नोकऱ्या परत मिळत नाहीत. लॉकडाउन संपला तरी खर्चाला कात्री लावण्यासाठी कंपन्या कामावरून काढत आहेत. जगायचं कसं हा प्रश्न आहे, अशी हतबलता युवकांनी व्यक्त केली.

तर ‘पैसे सोडा, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांच्या जेवणाची सोय केल्याचं मोदींनी सांगितलं होतं. मात्र, आमच्या गावात तर कुणालाच नाही भेटली ही मदत’ अशी सद्यस्थिती असल्याचे काहींनी सांगितले.

मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजबद्दल तरुणांमध्ये नाराजी आणि मोदींकडून भ्रमनिरास झाल्याची भावना प्रकर्षाने दिसली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment