अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : सध्या जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध सरकारी समित्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात युवक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे.
निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या शाबासकीची गरज आहे. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, समित्यांमध्ये स्थान देऊन कामाची संधी दिली तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील.
अशी तक्रार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपले मामा व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे केली आहे.
काँगेस पक्षात राज्यात खांदेपालटाची चर्चा सुरू असतानाच तांबे यांनी थोरात यांना पत्र लिहिले आहे. पत्रात तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यातील बारा जिल्ह्यांत काँग्रेसचे पालकमंत्री आहेत तर अन्य ठिकाणी पक्षाने संपर्क मंत्री नेमले आहेत.
या सर्वाना आम्ही पूर्वीच युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या याद्या दिल्या आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांना सहभागी करून घ्यावे, हा उद्देश आहे.
मात्र त्यातही युवक कार्यकर्त्यांना पुरेसे स्थान मिळत नाही. वास्तविक पाहता २०१९ च्या निवडणुकीत युवक कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आहेत. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत.
सध्या करोना संकटकाळातही युवक कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावत आहेत. स्वखर्चाने मदत करीत आहेत. निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना संधी दिली तर काँगेस पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असेही तांबे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews