पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून होणार सुरू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्याच अनुषंगाने राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या.

कोरोनाच संक्रमण हळूहळू कमी होऊ लागल्याने 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. तर, आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

कोरोनासंबंधित सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन या शाळा आणि त्यातील वर्ग उघडले जाणार आहेत. कोरोनामुळे मागील जवळपास 10 महिने बंद असलेल्या शाळा आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत.

कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू होत आहेत. पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे, शाळाचे निर्जतूकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News