पुणे: लॉक डाऊनमुळे अनेकांचे काम बंद पडले आहे. त्यामुळे सर्वांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
याचा सारासार विचार करता येत्या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्कवाढ न करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.
त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये काही शिक्षण संस्थांकडून शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या.
त्याची दखल शिक्षण विभागाने घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेचे चालू वर्षांचे आणि आगामी वर्षांचे शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे निर्देश एप्रिलमध्येच दिले होते.
आता शुल्क विनिमय कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शालेय शुल्काबाबत शासनाकडून शाळांना निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना-कनिष्ठ महाविद्यालयांना ते लागू असतील.
असे आहेत निर्देश
१) शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठीचे शुल्क मासिक किंवा त्रीमासिक पद्धतीने आकारावे.
२) नवीन शुल्कवाढ करू नये.
३) गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा द्यावी.