अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहर असो वा गाव सगळीकडे अतिक्रमणाची समस्यां हि दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे म्हणा कि या अतिक्रमण धारकांना कारवाईची भीती नसते.
अशाच एका कॉलेजसमोर झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेच्या विश्वस्तांनी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या
हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच रस्त्या लगतची अतिक्रमणे तात्काळ हटवावित या मागणीसाठी संस्थेचे संस्थापक
व कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत नेटके यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर यांनी सदर अतिक्रमणे नियमानुसार काढू,
असे लेखी आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे समक्ष दिले. मात्र अतिक्रमणे काढण्याची निश्चित तारीख द्या या मागणीवर आंदोलक नेटके ठाम राहिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले नाही.
याबाबत संस्थापक नेटके यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील बेनवडी येथील हरी नारायण स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे समोर अनधिकृत टपऱ्याची अतिक्रमणे असून
वारंवार निवेदने देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ती तात्काळ काढण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved