अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- आंदोलन म्हंटले कि गल्ली असो वा दिल्ली सगळ्यांच्या डोळ्यासमोर केवळ एकच चित्र तयार होते, ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे होय.
यातच तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले व जनमानसातील एक खंभीर नेता म्हणून ख्याती मिळवलेले आमदार निलेश लंके यांनी अण्णांची भेट घेतली.

यावेळी आण्णा यांनी आमदार लंके यांना अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे. समाजासाठी तुम्ही मोठे काम करीत आहात. मला भेटण्यासाठी आलेले लोक सांगतात, वर्तमानपत्रातही मी वाचतो. समाजाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे.
हे करीत असताना स्वतःच्या कुटूंबालाही वेळ दया, वेळेवर जेवण करीत जा. समाजाच्या काळजीबरोबरच तुमच्या कुटूंबाची, तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार नीलेश लंके यांना दिला.
दिवाळीचे औचित्य साधून आ. लंके यांनी मंगळवारी हजारे यांची भेट घेतली. सकाळी ११ वाजता भेटीस गेलेल्या आ. लंके व हजारे यांची तासभर विविध विषयांवर चर्चा झाली.
लंके यांनी गेल्या वर्षभरात मतदारसंघात केलेल्या कामांची माहीती हजारे यांना दिली. लवकरच होऊ घातलेल्या तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगितल्यावर हजारे यांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमध्ये वैयक्तीक हेव्या दाव्यांमुळे भांडणे, मारामाऱ्या होतात. त्यामुळे गावतील सामाजिक शांतता भंग पावते.
बिनविरोध निवडणूका झाल्यास गावातील एकोपा अबाधित राहण्यास मदत होईल. आ. लंके यांनी याकामी घेतलेल्या पुढाकारास यश यावे अशी अपेक्षा अण्णांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













