आमदार निलेश लंके यांच्या एका विधानावरून पारनेर तालुक्यात खळबळ..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो असे सूचक विधान आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील पारनेर गावची नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा इशारा कोणाला दिला आहे किंवा याचा राजकीय अर्थ काय आहे याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.

पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात आमदार निलेश लंके यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार निलेश लंके बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील शंकर फापाळे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अशोकराव सावंत,

उद्योजक सुरेश धुरपते, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, कडूस गावचे सरपंच नाना मुंगसे, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले की, राजकारण हे बदलते असते पण त्याचा परिणाम दूरगामी होतो

म्हणून येणार्‍या ग्रामपंचात निवडणुकांमध्ये गावागावांत वादविवाद थांबवून सर्वांनी एकत्र बसून गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा असे आमदार लंके म्हणाले.

बिनविरोध निवडणुका झाल्या तर गावचा विकास वेगाने होईल व गावं आदर्श होण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या गावात नवीन बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू करावी असे आवाहन अमादार निलेश लंके यांनी केले.

गारगुंडी गावचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझ्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज याच गावचे अपंग व्यक्ती त्र्यंबक झावरे यांनी भरला आहे.

मला या गावाने गेल्या 20 वर्षांपासून विशेष प्रेम दिले आहे. आता मला या गावाला काहीतरी द्यायचे आहे म्हणून मी आज आलो आहे असे आमदार लंके यावेळी म्हणाले.

तसेच भविष्यात गारगुंडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असाही सल्ला दिला. राजकारणात कोणीही कोणाचा जास्त काळ मित्र नसतो व शत्रूही नसतो असेही सूचक विधान केले.

महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून भाऊबीजेच्या मुहूर्तावर पारनेर तालुक्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यालय उघडणार असल्याचे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe