सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नितांडावात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत केली जाणार आहे.

आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.

मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. रामा शंकर हरीजन, बिपीन सराेज, सुशीलकुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतिक पास्ते अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment