अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ फलटण :- तालुक्यातील एका चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पिंप्रद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संशयित आरोपीस कडक शासन व्हावे, यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना मंगळवारी निवेदन दिले.
प्रजासत्ताकदिनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तानाजी दौलत भगत (५८, रा. पिंप्रद, ता. फलटण) याने सात वर्षांच्या चिमुरडीस घरात नेऊन अत्याचार केले. ही घटना चिमुरडीच्या आईला समजल्यानंतर तिने या संदर्भात भगत विरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस पोक्सोंतर्गत अटक केली.