अहमदनगर :- नगर शहरातील तपोवन रोड भागात वेश्या व्यवसाय करणार्या घरावर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी छापा टाकत पाच पुरुष, एका महिलेस ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला. रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील तपोवन भागात वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे,
पोलीस कर्मचारी विश्वास गाजरे, तरटे, शाईन पठाण आदींच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकला. तेथे काही महिला व पुरुष आढळून आल्या.
पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला एजंटला ताब्यात घेतले आहे, तर एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे.
- ‘हा’ 229 रुपयांचा स्टॉक 330 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात आत्ताच खरेदी करा
- उद्या बँकांना सुट्टी राहणार ! मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार, RBI ची सुट्ट्यांची यादी पहा…
- कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल
- प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल ! खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला
- महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर बँकेकडून तुम्हाला किती पर्सनल लोन मिळणार ? बँकेचे नियम काय सांगतात ?