अहमदनगर मध्ये रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर :- शहरातील गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला.

रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून तीन बळी महिलांची सुटका करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध भागात सेक्स रॅकेट सुरू आहेत.

गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री साध्या वेशात संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली.

त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून धंद्यासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment