अॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात उघड झाला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर २५ वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी हा विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com