शरद पवार यांनी तरुण पिढीला केले हे आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा केवळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेले पाहिजे.

ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीला केले.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या अभिप्राय नोंदणीत राज्यात अहमदनगरच्या ओबीसी सेलने प्रथम क्रमांक पटकावला.

त्याबद्दल पवार यांच्या हस्ते यांच्या राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गवळी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार प्रफुल्ल पटेल, नामदार नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe