शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले. इतकच नाही तर, काँग्रेस पक्षाने पवार यांना अपमानास्पद वागणूक दिली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर हे खळबळजनक आरोप केले आहेत. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही.

त्यामुळे शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करावे असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आम्हालाच फायद्याचे आहे.

यामुळे आम्हाला चांगली संधी मिळते असा टोलाही त्यांनी लगावला. सोनिया गांधी यांनीही पवारांकडे दुर्लक्षच केले. काँग्रेसमध्ये असताना पवार यांच्यावर अन्याय झाला.

आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसजवळ आहे. यामुळे शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करण्यास काही हरकत नसल्याचे आठवले म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe