शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या हिताच्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत,

अशी टीका करत रयत संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “शरद पवार, तुम्ही जास्त खोटे बोलू नका, नाही तर इतिहासात तुमची नोंद जाणते राजेऐवजी विश्वासघातकी राजे’ म्हणून केली जाईल, असे टीकास्त्र सोडले.

शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत ते जे वक्तव्य करतील त्याविरुद्ध कृती करतात, असे दिसते.

सूर्य पश्चिमेकडून उगवतो, असा दावाही शरद पवार यांच्या आत्मचरित्रात केला गेल्यास वावगे ठरणार नाही. बाजार समितीत मालाच्या विक्रीसंदर्भात सध्या शरद पवार विरोध दर्शवत आहेत.

मात्र, ते स्वत: केंद्रीय कृषिमंत्री असताना याच कायद्याचे समर्थक होते आणि आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन हा प्रश्न चिघळवत असल्याचे ते म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment