न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींना सवय – शरद पवार यांची टीका

Published on -

कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.

मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला. 

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.

गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.

या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News