…आणि शरद पवारांनी नगरमध्ये मुक्काम टाळला !

Published on -

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर मतदारसंघातून उमेदवारी केल्याने शरद पवार यांनी नगरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरला मुक्कामी थांबून दोन्ही निवडणुकांतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची रणनीती शरद पवार निश्चित करणार असल्याचे सांगितले जात होते.

मात्र, केवळ चार ते पाच तास येथे थांबून व दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पवारांनी रणनीती निश्चित केली व नगरचा मुक्काम मात्र टाळला. तोही आता चर्चेचा झाला आहे.

बडी साजन मंगल कार्यालयातील व्यापारी-उद्योजक बैठकीनंतर शरद पवार लगेच पुण्याकडे रवाना झाले.

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

शरद पवारांच्या दौर्यानंतर अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe