हमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-आगामी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकात आसाम वगळता अन्य चार राज्यांत भाजपचा पराभव होईल, असाच ट्रेंड दिसत आहे.
भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, असे पवार यांनी म्हटले आहे. बारामती येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांची स्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी हे भाकीत केले. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे. बंगाली संस्कृती आणि तेथील लोकांचे मन यावर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला,
तर राज्य एकसंघ होते. आणि तशी प्रतिक्रीया व्यक्त होते, त्यामुळे येथे ममता यांचीच सत्ता येईल, हे स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले. तर केरळचा विचार केला तर येथे भाजपची सत्ता येणार नाही.
केरळमध्ये डाव्यांच्या सोबत राष्ट्रवादी आहे. या ठिकाणी डाव्यांची सत्ता निश्चित निर्विवाद बहुमतात येईल. तामिळनाडूमध्ये आज लोकांचा कल स्टॅलिन (डीएमके) यांच्या बाजूने दिसत आहे.
स्टॅलिन हे तमिळनाडूची सूत्रे हाती घेतील अशी स्थिती दिसत आहे. तर आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक चांगली आहे, तेथे त्यांचा विजय होईल असे वाटते, असे पवार म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|