अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-राज्यात आघाडीचे सरकार केवळ शरद पवारांमुळे शक्य झाले. कोणाच्या स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्षात आले.
ही दूरदृष्टी केवळ पवार साहेबांमध्येच असू शकते. ती इतर कुणाला अद्याप तरी लाभलेली आहे, असे वाटत नाही. आज ते ८० वर्षांचे झाले, ते शतायुषी व्हावेत.
त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, आता देशातील राजकारण बदलावे…अशा शुभेच्छा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. राज्याप्रमाणेच देशातील राजकारण बदलण्याची ताकद, कौशल्य आणि बुद्धिचातुर्य पवार साहेबांमध्ये आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. शरद पवारांचा उल्लेख योद्धा म्हणूनच केला जातो.
८० वर्षांचे शरद पवार असे म्हटले जाते, पण ८० वर्षांचे म्हातारे असा उल्लेख त्यांचा कुणीही करत नाही. कारण तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, अशी ऊर्जा त्यांच्यात या वयातही आहे. ते भूतकाळ आहेत, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही आहेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com