सातारा : १९७८ मध्ये शरद पवारांनीही हेच केले होते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कानावर आमदारांच्या एकनिष्ठतेबाबतची बातमी आली होती. त्यावेळी पवारांनी पाटील यांना भेटून ‘शंका घेऊ नका’ असे सांगून आश्वस्त केले होते.
सभागृह सुरु झाले त्यावेळी पवार १८ ते १९ नेत्यांना घेऊन विरोधकांसोबत बसले. त्यावंतर वसंत पाटील यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला.
‘समोरासमोर बोलून केले असते तर चाललं असतं पण शरद पवार मराठ्यांसारखे लढले नाहीत’ अशी प्रतिक्रिया वसंत पाटील यांनी त्यावेळी दिली होती अशी आठवण त्यांच्या पत्नी शालीनी पाटील यांनी काढत शरद पवारांना नियतीनेच उत्तर दिल्याची भावना व्यक्त केली.
शिखर घोटाळ्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, या प्रकरणात अजित पवारांएवढेच शरद पवारही जबाबदार आहेत. या दोघांसोबत इतर ६० जण आहेत.
हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालता येते का, संरक्षण मिळवता येते का असे सवाल करत सत्ता त्यावर तात्पूरते पांघरुण घालते. काही दिवसांसाठी त्याचा उपयोग होतो. एवढा मोठा भ्रष्टाचार पाठिशी घालायला देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपतीही तयार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.