अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात.
याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो, या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय,’ अशी टीका माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.

जिल्हा बॅंकेच्या वतीने गोपालनासाठी शेतकऱ्यांना खडकी येथील एडीसीसी बँकेत कर्जवाटपाच्या कार्यक्रमानंतर कर्डिले बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवरून राज्य सरकारवर हल्ला चढवला.
ते म्हणाले, ‘कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार हे प्रत्यक्षात अपयशी ठरले आहे. हे मी नाही तर सर्वसामान्य जनता देखील बोलत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. आयसीयूची व्यवस्था नाही. मेडिसिन वेळेवर मिळत नाही. लाखो रुपये हॉस्पिटलला द्यावे लागतात.
हे सर्व पाहता कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचे पाहण्यास मिळते. दुसरीकडे देशाचे नेते शरद पवार सांगतात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन आहेत. कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही. त्यांना फिरू दिले जात नाही, आणि पवार साहेब मात्र या वयामध्ये जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात.
त्याच्यामागे असाही हेतू दिसतोय की, राज्यातील शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल एवढाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचे पाहण्यास मिळतय,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved