शिर्डी विमानतळाला 300 कोटी मिळणार; उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-जगभर ख्याती पसरलेले जिल्ह्यातील शिर्डी देवस्थान हे नेहमीच चर्चेत असते. या ठिकाणी लाखो भक्त देशभरातून येत असतात. यामुळे येथील विकास कामे नेहमीच गतिशील असतात.

यातच शिर्डी विमानतळासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार सोमवारी काकडी विमानतळाच्या विविध समस्या व विकासकामांबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली.

या बैठकीत आ. काळे यांनी काकडी-शिर्डी विमानतळाच्या विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच देशविदेशातून येणार्‍या साईभक्तांच्या दृष्टीने व काकडी व पंचक्रोशीतील गावांचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी सुधारीत विकासकामे व्हावीत, अशी मागणी आमदार काळे यांनी केली होती.

यावेळी शिर्डी विमानतळासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून देवू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. दरम्यान विमानतळासाठीच्या विकासकामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना रोजगारांमध्ये प्राधान्य द्यावे.

कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. काकडी गावातील शेतीसाठी विमान प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 24 तास वीज देण्यात यावी. तसेच विमानतळावरील विविध कामांचे टेंडर स्थानिकांना देण्यात यावे.

अशा अनेक महत्वाच्या रखडलेल्या समस्यां आ. काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यापुढे मांडल्या. या मागण्यांचा ना. पवार यांनी गांभीर्याने विचार करून सर्व मागण्यांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News