Shirdi-Chennai Express : साईनगर शिर्डी आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22601 आणि 22602 या चेन्नई-साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेसच्या रचनेत रेल्वेने मोठा बदल केला आहे. आता या गाड्या LHB (लिंक हॉफमॅन बुश) कोचसह चालवल्या जाणार आहेत.
हा बदल चेन्नईहून 21 मे 2025 पासून आणि साईनगर शिर्डीहून 23 मे 2025 पासून लागू होईल. नवीन रचनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, कारण LHB कोच हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पारंपरिक ICF कोचपेक्षा जास्त मजबूत मानले जातात.

नवीन सुधारित रचनेत एकूण 20 LHB कोच असतील. यामध्ये 1 AC-II टियर कोच, 6 AC-III टियर कोच, 7 स्लीपर क्लास कोच, 4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच, 1 सामान्य द्वितीय श्रेणी कोच, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.
ही रचना प्रवाशांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. AC कोचपासून ते सामान्य श्रेणीपर्यंत सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी पर्याय उपलब्ध असतील. या बदलामुळे जागा आरक्षणातही काही फरक पडू शकतो, त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना आपलं बुकिंग करताना या नव्या रचनेची नोंद घेण्याची विनंती केली आहे.
या गाड्या सध्या साईनगर शिर्डी ते चेन्नई आणि चेन्नई ते साईनगर शिर्डी असा साप्ताहिक प्रवास करतात. ट्रेन क्रमांक 22601 ही चेन्नईहून दर बुधवारी सकाळी 10:25 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:50 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचते.
तर ट्रेन क्रमांक 22602 साईनगर शिर्डीहून दर शुक्रवारी सकाळी 8:25 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:25 वाजता चेन्नईला पोहोचते. या दोन्ही गाड्या आता LHB कोचसह नव्या रचनेत धावतील.
थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी आणि इतर माहितीसाठी प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचा किंवा NTES ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हा बदल प्रवाशांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, कारण LHB कोचमुळे प्रवासात आराम तर वाढेलच, पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही फायदा होईल. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी आपल्या तिकिटांचं नियोजन करताना नव्या रचनेची माहिती घेऊनच पुढे जावं, जेणेकरून त्यांना कोणताही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.