शिर्डी – शिडींतील गुंडगिरी व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे.
शिर्डी परिसरात बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरुन काल रात्री 8:05 च्या सुमारास सौंदडी बाबा मंदिराजवळ कालिकानगर भागात छापा टाकला.


या ठिकाणी पोलिसांनी भिंगरी दारुच्या बाटल्या, किंगफिशर दारुच्या बाटल्या, फ्रिजमध्ये असल्याच्या स्थितीत पकडल्या.
पोलीस छापा टाकून कारवाई करत असताना तेथे असलेली आरोपी महिला जया प्रविण आल्हाट हिने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन फ्रिजच्या वायरने आत्महत्येचा प्रयत्न केला.

तेव्हा महिला पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले , व तीला ताब्यात घेतले. या ठिकाणी झडती घेतली असता दारु बिअरच्या बाटल्यांसह धारदार हत्यारही मिळून आले.

पोसई वंदना अशोक सोनुने (शिर्डी पो. स्टे.) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी जया प्रविण आल्हाट, प्रविण उर्फ भाऊसाहेब पोपट आल्हाट दोघे रा. सौंदडीबाबा मंदिराजवळ, कालिकानगर शिर्डी
यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०९, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सोनई परिसरात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मावा कारखान्यावर मोठी कारवाई, ८० हजारांच्या मुद्देमालासह एकाला केली अटक
- अहिल्यानगर तालुक्यात महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, भिंतीवरच लटकवले मीटर
- अकोले तालुक्यातील आढळा धरण १०० टक्के भरले, शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण
- संगमनेरच्या चंदनापुरी घाटात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, ४ विद्यार्थी किरकोळ जखमी
- अहिल्यानगरमध्ये स्वस्तात प्लाॅट देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या पोलिसाला ठोकल्या बेड्या, तर सेवेतूनही करण्यात आले निलंबित