शिर्डीत हॉटेलमध्ये १९ वर्षाच्या युवकाची गोळी झाडून हत्या

Published on -

शिर्डी :- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हाॅटेल पवनधाममध्ये अज्ञात चार व्यक्तींनी १९ वर्षाच्या युवकाच्या गोळीबार करून हत्या केली. यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

प्रतीक संतोष वाडेकर (१९, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

यातील चार संशयितांपैकी मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली आहे.

मंगळवारी हाॅटेल पवनधाम येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रतीक वाडेकर या दोघांसह पाच जणांना फ्रेश होण्यासाठी रुम नंबर १०४ भाड्याने देण्यात आली होती.

पाचजण रुममध्ये जाताच हाॅटेल मालक गोविंद गरूर यांना जोरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. या वेळी हाॅटेल मालकाने पाहिले असता

चार जण पहिल्या मजल्यावरून पळून जाताना दिसले. या वेळी यातील एकास गोविंद गरूर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पलायन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe