शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे.
दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला.
याची खबर शहरात वार्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी व भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत होते.
अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भावीकांनी एकच गर्दी केली होती.दरम्यान यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला व्दारकामाईत दिसले होते. त्यानंतर 12 एप्रिल 2018 ला दिसले होते. मात्र यावेळी बाबांचा चेहरा थोडा अस्पष्ट दिसत आहे.
- ‘हा’ 229 रुपयांचा स्टॉक 330 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात आत्ताच खरेदी करा
- उद्या बँकांना सुट्टी राहणार ! मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार, RBI ची सुट्ट्यांची यादी पहा…
- कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल
- प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल ! खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला
- महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर बँकेकडून तुम्हाला किती पर्सनल लोन मिळणार ? बँकेचे नियम काय सांगतात ?