तपोवन रस्त्यावरून शिवसेनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- दरदिवशी शहरातील रस्ते, खड्डे यामुळे नगरकर त्रासले आहे. नादुरुस्त निकृष्ठ रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. याबाबत समजलेली माहिती अशी कि, गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे.

मात्र या रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी आक्षेप घेऊन कामची चौकशी करण्याची मागणी केली होती.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या पुण्याच्या कार्यालयामार्फत जुलै महिन्यात कामाची पाहणी दर्जाची तपासणीसाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षकांची नियुक्ती केली होती.

या पाहणीच्या अहवालाची मागणी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एच.एन. सानप यांची भेट घेवून त्यांना चांगलेच धारेवर धरले.

माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, ऋषिकेश ढवन, दत्ता हजारे आदि उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment