अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्यात स्वार्थ पोटी झालेली आघाडी जनतेला मान्य नाही. यामुळे जनतेला मान्य नसलेल्या आघाडीमुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पा.यांनी व्यक्त केला.
यावेळी पारनेर राजकीय घडामोडीवर विचारले असता, ते पुढे म्हणाले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना स्वाभिमानी म्हटली जात होती.
अजूनही शिवसेनावाल्याकडे स्वाभिमान आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी पार्टी सोडून भाजपामध्ये यावेत. त्यांना पदे देऊ, सन्मान आणि सत्ताही देऊ, असे ते सोमवारी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
खा.विखे पुढे म्हणाले, राज्य शासनाकडे पैसे राहिले नाहीत. यामुळे दररोज नवीन नियम काढत आहेत. मंत्री लाँक झाल्याने जनता आँनलाँक झाली आहे अशी टीकाही सुजय विखे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews