हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ……

Published on -

अहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवसभर धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे.

आता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पवईतील रेनीनसन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप शनिवारी रात्री उशिरा बाहेर फिरायला चाललोय असे सांगून हॉटेल मधून बाहेर पडले त्याच वेळी त्यांची गाडी पण याच वेळी तिथे पोहोचली.

याच दरम्यान शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पाहिले व त्यानी आ. जगताप यांना पुन्हा हॉटेल मध्ये घेऊन गेले. असे वृत्त आज तक या वृत्तवाहीनीने दिले आहे.

दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि हे तिन्ही पक्षाचे नेते आमदारांच्या घोडेबाजार होण्याच्या शक्यतेमुळे अलर्ट आहेत.

राज्यातील सत्तांतराच्या घडोमाडींतील अनिश्चितता आणि आमदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार सुरु आहेत.

त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत. या आमदारांना खासगी सुरक्षा रक्षक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण आहे. त्यासाठी नाशिकचे पन्नासहून अधिक जण सक्रीय आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe