बाळासाहेब थोरातांचे खरे रूप शिवसेनेच्या लोकांना कळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. सभापतिपदी सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर, तर उपसभापतिपदी नवनाथ अरगडे यांची निवड झाली.

सभापतिपद महिला राखीव झाल्याने मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले.

जोर्वेकर यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आशा पंढरीनाथ इल्हे यांनी अर्ज दाखल केला.

उपसभापतिपदासाठी काँग्रेसचे नवनाथ धोंडिबा अरगडे यांच्या विरोधात शिवसेनेचे अशोक बबन सातपुते यांनी अर्ज दाखल केला.

जोर्वेकर यांना १३, तर इल्हे यांना ५ मते मिळाली. उपसभापतिपदासाठीही अरगडे यांना १३, तर सातपुते यांना ५ मते मिळाली.

काँग्रेसचे पक्षप्रतोद विष्णुपंत रहाटळ यांनी व्हीप बजावला असताना विखे गटाच्या दीपाली डेंगळे व निवृत्ती सांगळे यांनी शिवसेनेला मतदान केले.

थोरात-विखे गटबाजी या निवडणुकीत दिसून आली. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सातपुते यांनी उपसभापतिपदासाठी काँग्रेसकडे आग्रह धरला होता.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याने थोरात यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप करत त्यांनी सभागृहातून बाहेर पडताच समर्थकांसह निषेधाच्या घोषणा दिल्या.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी शिवसेनेची सदस्य संख्या केवळ २ असल्याने उपसभापतिपदावर त्यांचा दावा करणे चुकीचे आहे.

राज्याच्या आघाडीबरोबर तालुक्यातही आघाडी राहील. मात्र, त्यासाठी पक्षीय बलाबल आवश्यक असते, असे ओहोळ यांनी पत्रकारांना सांगितले.

संगमनेर पंचायत समिती उपसभापतिपदाची मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने केली होती;

परंतु, महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात आघाडी राबवली नाही.

त्यामुळे त्यांचे खरे रूप आता शिवसेनेच्या लोकांना कळाले आहे,’ अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment