मुंबई :- काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या आमदारांची हॉटेलमध्ये भेट घेतली व शिवसेनेचाच मुख्यमंत्री हाेईल, असे आश्वस्त केले.
त्यांच्यासाेबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हाेते. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांचा ठाकरे यांनी या वेळी आमदारांच्या बैठकीत सत्कार केला. तत्पूर्वी सकाळी उद्धव यांनी रुग्णालयात जाऊन खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली.