अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एखादया लाटेत जर माझा पराभव झाला असेल पण मी परभावाने खचुन जाणार नाही . मला जनतेने कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नसतांनी पाच वेळेला विधानसभेवर पाठवले असुन राजकारणात जय पराजय असतो पण मी थकणारा माणुस नसल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे.
राहुरी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांचा मेळावा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
माझ्यावर यापुर्वी अनेक संकट आले आहेत पण खचलो नाही. प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. आमदार नसलो तरी कार्यकत्यांनी खचून जावु नये मी तुमच्या आहे. आघाडी सरकारला १०० दिवस झाले म्हणतात पण त्यांना अजुन १०० दिवस देऊ अन्यथा आपल्याला शेतकरी व सर्व सामन्य जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागेल.
मी सध्या राजकीय भाषण करणार नाही अजून वेळ बाकी आहे . सध्या अनेक कामांचे श्रेय घेण्याचे काम विरोधकांचे चालु असल्याचे माजी आ.कर्डिले म्हणाले.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही माजी आमदार कर्डिले यांनी कार्यकत्यांना धिर देण्याचे काम केले, यामध्ये त्यांनी कारणे शोधली ती सर्वांना माहित आहे. पण यामध्ये एक सकाळपासुन संध्याकाळपर्यंत जनतेत असणारा , प्रत्येकाच्या सुख – दुखात सामील असणारा माणुस आपण गमवला याचे आत्मचिंतन करण्यात गरज आहे असे भानुदास बेरड म्हणाले.
यावेळी उत्तमराव महसे आसाराम हुस , शिवाजी सयाजी गाडे , गोरक्षनाथ तारडे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड , आण्णासाहेब शेटे सुभाष वराळे , मा . नगरसेवक राजेद्र बंडे , सुवर्णा खरे , योगेश देशमुख , गणेश खेरे , संजय भळगट , विजय चानकर रुषिकेश तनपुरे , दत्तात्रय इस शरद उदावंत , अतिक बागवान आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com