अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.

दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक विकासावर लढवायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाच्या विचारानुसार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण करायचे आहे, असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील युतीचे सर्व आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता.
- Sun Pharma Share Price: सन फार्मा शेअरमध्ये 12.80% ची उसळी! SELL करावा का? बघा माहिती
- LIC Share Price: LIC चा शेअर तुमच्याकडे आहे का? पटकन वाचा फायद्याची अपडेट
- आज ‘या’ ऑटोमोबाईल कंपनीचा शेअर रॉकेट! 1 महिन्यात 8% रिटर्न…पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Prestige Estate Share Price: आज ‘या’ शेअरमध्ये 51% ची घसरण! पैसा मातीमोल… तुमच्याकडे तर नाही ना?
- Yes Bank Share Price: 6 महिन्यात 23.75% ची तेजी! आज होईल का फायदा? बघा अपडेट