नगर – केडगाव परिसरात तडीपार गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील हत्त्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. आरोपी सुनील सातपुते, निलेश भालसींग, महेश साके यांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या आठा दिवसापूर्वी दोन गटात राजकीय वादातून केडगावात पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोडवरील हॉलीबॉल मैदान येथे मनोज कराळे याला मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.1) रोजी रात्री घडली होती. या घटनेत मनोज कराळे हा गंभीर जखमी झाला होता.
महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यापासून हा वाद आणखीनच चिघळला आहे. सातपुते व कराळे हे दोघे वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच कुरघोडी होत असल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जखमी मनोज कराळे याची आई मीना भाऊसाहेब कराळे (वय -42, रा. शिवाजीनगर मराठी शाळेजवळ) यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे (सर्व रा. केडगाव, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, जीआर पण निघाला
- व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये सुधारणा ! स्टॉक Hold करावा, SELL करावा की BUY ? तज्ज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
- Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 95% रिटर्न मिळणार
- Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत चार लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…
- ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल; एका महिन्यात 135% रिटर्न!