अहमदनगर :- शिवसनेचे उपनेते अनिल राठोड हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. मात्र असे असताना शिवसेनेच्या माजी महापौर शीला शिंदे त्याचप्रमाणे माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम हेदेखील विधानसभेची तयारी करत आहेत.
उपनेते राठोड यांच्या बरोबरीने शिंदे व कदम यांनी वरिष्ठांकडे शहर विधानसभेवर शिवसेनेच्या उमेदवारीचा हक्क सांगितला. त्यामुळे नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडल्याची चर्चा आहे. नगर शहर शिवसेनेवर एकहाती वर्चस्व असलेल्या राठोड यांना स्वपक्षातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
माजी आ. अनिल राठोड यांनी गेली पंचवीस वर्षे नगर विधानसभेवर शिवसेनेचे वर्चस्व केले होते. २०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती शेवटच्या क्षणी युती तुटली. त्यातच कॉगेस व राष्ट्रवादीत बिघाडी झाल्याने माजी आ. राठोड यांचा अल्प मतांनी पराभव झाला.
मात्र गेल्या काही वर्षांत शहराच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. पराभवानंतर राठोड हे पुन्हा ताकदीने विधानसभेसाठी सज्ज झाले. त्यातच भाजपचे खासदार सुजय विखे याना लोकसभेच्या निवडणूकित नगर शहरातून 50 हजाराची आघाडी प्राप्त करून देण्यात राठोड व शिवसेनेचा खारीचा वाटा होता.
प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला अनिल राठोड हे एकमेव नाव उमेदवारीसाठी पुढे होते. यंदा त्यांच्या बरोबरीने माजी महापौर शीला शिंदे व संभाजीराजे कदम ही दोन मोठी नावे उमेदवारीच्या यादीत आली आहे. विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी मुंबईत जोरादार फिल्डिंग लावली आहे.
शहराच्या राजकारणात माहिर असलेले शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे हे माजी महापौर शीला शिंदे यांचे पती आहेत. त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात फेज १ व फेज २ पाणी योजना, बालिकाश्रम रोड, कोठी रोड, दर्गादायरा रोड , केडगाव देवी रोडची कामसह अनेक मोठी कामे केली आहे. त्यासोबत ३१ कोटी रुपयांचा १ हजार घरकुलांचा प्रोजेक्टही राबविण्यात त्याचा मोठा वाटा आहे.
सावेडीतील स्पर्धा परीक्षा केंद्र, नाट्यसंकुल, रेल्वेस्टेशनचा लोखंडी पूल ही कामेही शिंदे यांच्या कार्यकाळात सुरु झाली. त्या विकासकामाच्या जोरावरच शिंदे यांनी तिकिटासाठी मजबूत फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान संभाजी कदम हे गेली १२ वर्षे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम करत होते. पत्नी सुरेखा या महापौर झाल्यानंतर त्यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पत्नी महापौर असताना त्यांच्या कार्यकाळातील कामे व शहरप्रमुख असतांना झालेले संघटनात्मक कामावर त्यांनी शिवसेनेकडे आमदारकीचे तिकिट मागितले असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरु आहे.
युतीच्या जागा वाटपात नगर शहराची जागा शिवसेनेकडे आहे. ही जागा भाजपकडे घेण्याची मागणी यापूर्वीच भाजप नगरसेवकांकडून करण्यात आली होती. युती की स्वबळ याबाबत भाजप शिवसेनेत अजून निश्चित दिशा मिळालेली नाही.
मात्र विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्याने शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्चित असल्याचे शिवसेनेतूनच सांगितले जात आहे. राठोड यांच्या व्यतिरिक्त सेनेतील अन्य काहीजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
त्यामुळे पक्षनिरीक्षक विलास घुगरे यांनी दि. ३ ऑगस्ट रोजी नगरमध्ये येऊन शिवसेना नगरसेवकांची मते जाणून घेतली होती. या मुलाखतीबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. फक्त नगरसेवकांनाच निरोप धाडण्यात आले होते. यामुळे शिवसेनेत उघड – उघड दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
- तुम्हाला बजरंगबली हनुमानाच्या गदेचे नाव माहिती आहे का ? पवनपुत्राला कोणी दिली होती गदा ? वाचा…..
- लाडक्या बहिणींनो 1500 सोडा ‘या’ योजनेतून दरमहा मिळणार सात हजार रुपये ! 10 वी पास महिला अर्ज करू शकतात
- OnePlus लवकरच लॉन्च करणार सर्वाधिक स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन ! कसा असणार वनपल्सचा Open 2 स्मार्टफोन ?
- तुमचे Pan Card सुरु आहे का ? खराब झालेय ? असे बनवा नवे कार्ड
- iPhone 16 : आयफोन खरेदीसाठी सुवर्णसंधी ! ह्या पेक्षा स्वस्त कधीच मिळणार नाही…